शिर्डी विमानसेवा बुधवारपासून पूर्ववत सुरू होणार

360

खराब हवामानामुळे 27 दिवसापासून बंद असलेले साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ बुधवारपासून सुरू होणार असून दररोज 12 विमानांचे उड्डाण होणार आहे. बुधवारपासून दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, बंगळूर येथे जाणारी व येणारी सेवा सुवीध स्पाईट जेट कंपनी सुरू करनार असल्याची माहिती विमानतळाचे संचालक दीपक शास्री यांनी दिली.

कमी दृश्यमानता व खराब हवामानामुळे 14 नोव्हेंबरपासून शिर्डी विमानतळावरील विमान सेवा बंद करण्यात आली होती. या काळात सुमारे साडेसातशेहून अधिक विमानांचे लँडींग व उड्डान रद्द करण्यात आले होते. दृश्यमानता वाढविण्यासाठी विमानतळावर विद्युतीकरण करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर डिजीसीएकडून नाईट लँडींगलाही परवानगी मिळाल्यावर ही सेवा सुरू होईल. या विमानतळावरून रोज दिड हजार प्रवाशी प्रवास करत होते. विमानसेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल झाले.

आपली प्रतिक्रिया द्या