शिर्डी प्रशासनाची अतीक्रमने व अवैद्य व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाविकांची सुरक्षा, भविकांना होणारा त्रास, शहरातील अवैध व्यवसाय आदी बाबीवर शिर्डीकर आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभुमीवर प्रशासनही सक्रिय झाले आहे. नगरपंचायतने शहरातील विविध भागात शुक्रवारी अतिक्रमण मोहिम राबवली यावेळी प्रसादालयाकडे जाणारा रस्ताही मोकळा केला. याशिवाय पालखी रोड, साई कॉम्प्लेक्स मध्येही मोहिम राबवण्यात आली.

दरम्यान पोलीसांनी नगरपंचायतला पत्र देवुन अतिक्रमणे हटवण्यासाठी हवा तेवढा बंदोबस्त पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे नगरपंचायतने शुक्रवारी भल्या पहाटे साईनगर लगतच्या पानमळा चारीजवळील काही अतिक्रमणे जमिनदोस्त केली. यापुढे देखील अतिक्रमण विरोधी मोहीम अजून सक्त केली जाणार असून त्यास अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल केले जाणार असल्याचा इशारा दिघे यांनी शिर्डी प्रशासनाने दिला आहे.