शिर्डी – 635 कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय

1153

साईबाबा संस्थानच्या सन 2001 ते 2004 या कालावधीत कंत्राटी पद्धतीने काम करणा-या 635 कर्मचाऱ्याना संस्थान सेवेत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. संस्थान सेवेत घेण्यात आल्याने शिर्डी नगरपंचायत समोर फटाके फोडुन जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

साईबाबा संस्थानमध्ये गेल्या अनेक वर्षापासुन कंत्राटी पध्दतीने कर्मचारी काम करत आहे. आज ना उदया आपण सेवेत कायम होऊ अशी अपेक्षा या कर्मचा-यांना होती. अखेर सन 2004 पर्यंतच्या कर्मचा-यांना संस्थान सेवेत कायम करण्यात आल्याने या कर्मचा-यांत आनंदी आनंद व्यक्त केला जात आहे.

सन 2008 साली साईबाबा संस्थानमध्ये कंत्राटी पध्दतीने काम करणा-या सन 1991 ते 2000 पर्यंतच्या 1052 कर्मचा-यांना संस्थान सेवेत कायम करण्यात आले होते. त्यानंतर उर्वरीत कर्मचा-यांना संस्थान सेवेत कायम करावे यासाठी राज्य शासनाकडे साईसंस्थान विश्वस्त मंडळाचा पाठपुरावा चालु होता. सन 2004 साली संस्थान शासनाच्या नियंत्रणाखाली गेल्याने हा प्रश्न प्रलंबीत राहीला होता. साईसंस्थान 2004 च्या नियमानुसार उर्वरीत कर्मचा-यांना कायम करावे यासाठी सातत्याने शासनाकडे पत्रव्यवहार संस्थान व्यवस्थापन मंडळाने चालु ठेवला. याबाबत अखेर शासन निर्णय दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या