शिरोडकर स्पोर्टस् क्लब अजिंक्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आर्य सेवा मंडळ आयोजित आणि अरुण दुधवडकर यांच्या सहकार्याने तसेच मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने खेळवण्यात आलेल्या ‘साहेब चषक’ महिला कबड्डी स्पर्धेत शिरोडकर स्पोर्टस् क्लबने अजिंक्यपदाला गवसणी घातली. याप्रसंगी अरुण दुधवडकर व मुंबई शहर स्थापत्य समिती अध्यक्षा अरुंधती दुधवडकर, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, महिला विभाग संघटक जयश्री बाळ्ळीकर, शिवाजी रहाणे, उपविभागप्रमुख सुजित राणे, मलबार हिल महिला विभाग संघटक सुरेखा उबाळ, समन्वयक लता पाटील, शाखा संघटक सुप्रिया शेडेकरसह समन्वयक किरण बाळसराफ, कार्यालय प्रमुख यशवंत कोळेकर, दिलीप सावंत या मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले.