
शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपला जो प्रस्ताव दिला आहे त्यावर गांभीर्याने विचार करून तो मान्य करावा असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या मागणीचे जोरदार समर्थन केले आहे.
मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेने जो प्रस्ताव भाजपपुढे ठेकला आहे त्यावर गांभीर्याने किचार होण्याची गरज असून हा प्रस्ताव भाजपला मान्य नसेल तर पाच वर्षांसाठी शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद द्यावे तसेच राज्यात दोन-तीन जास्त मंत्रीपदे व केंद्रात जास्तीचे मंत्रीपद शिवसेनेला देऊन राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडवावा, असे आठवले म्हणाले.
राज्यातील जनतेने महायुतीला सत्तेचा कौल दिला आहे. संख्याबळाचा विचार करता शिवसेनेशिवाय महायुतीची सत्ता स्थापन करणे शक्य नाही. त्यामुळे शिवसेनेचे समाधान होईल असा तोडगा भाजपने काढावा. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यास आपण तयार असल्याचे आठवले म्हणाले. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवीदी आघाडीसोबत जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
























































