
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे वेध लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माध्यमातून झालेल्या कामांच्या भूमिपूजनाचा घाट घातला असताना आता कार्यक्रमासाठीचा संपूर्ण खर्चदेखील महापालिकेच्याच माथी मारण्यात आला आहे. विशेष म्हणजे या भूमिपूजनात राज्य सरकारच्या अखत्यारीतील प्रकल्प, ठाण्यातील प्रकल्पांचाही समावेश असल्याचे कळते. शिवाय श्रेय लाटण्यासाठी ‘मिंधे’ सरकारच्या दबावाखाली याआधी भूमिपूजन झालेल्या प्रकल्पांचेही पुन्हा भूमिपूजन करण्यात येणार आहे. पालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यक्रमाच्या तयारीसाठी जुंपली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी मुंबई दौऱयावर आहेत. यावेळी ‘बीकेसी’ येथे ‘एमएमआरडीए’ मैदानावर त्यांची सभाही होणार आहे. याच कार्यक्रमात महापालिकेच्या अनेक कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईतील 6000 कोटींचे 400 किमीचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते, 26 हजार कोटींच्या सिव्हरेज ट्रिटमेंट प्लांट, नवी मोठी रुग्णालयांची भूमिपूजने होणार असल्याचे कळते. याच वेळी ठाण्याचे कॅन्सर हॉस्पिटल, नवी मुंबई मेट्रो भूमिपूजन तर मुंबई मेट्रो मार्ग – 7, मेट्रो-2च्या दुसऱया टप्प्याचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमासाठी होणाऱया खर्चाची जबाबदारीही संबंधित सर्व आस्थापनांनी विभागून घेणे आवश्यक होते. मात्र केवळ ‘मिंधे’ सरकारच्या दबावामुळेच कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च महापालिकेच्या माथी मारण्यात आल्याबद्दल मुंबईकरांमधून तीक्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पालिकेची यंत्रणा-प्रशासन या कार्यक्रमाच्या नियोजनात जुंपण्यात आल्याने अधिकारी-कर्मचाऱयांकडूनही संताप व्यक्त होत आहे.
75 हजार लोकांची व्यवस्था, जाहिरातबाजी
- पंतप्रधान येत असलेल्या कार्यक्रमासाठी 75 हजार लोक येण्याचा अंदाज असून यासाठीची व्यवस्था महापालिकेला करावी लागणार आहे.
- यामध्ये बैठक व्यवस्था, पाणी, फिरती शौचालये, स्वच्छता आणि महत्त्वाचे म्हणजे पालिकेच्या कामांची ऑडिओ, व्हिडीओ आणि प्रसारमाध्यमांमध्ये जाहिरात करण्याची जबाबदारी राहणार आहे.
पालिकेच्या कोटय़वधींच्या कामांचे भूमिपूजन होणार
समुद्रात जाणारे दूषित पाणी रोखण्यासाठी सात सिकरेज ट्रिटमेंट प्लांट सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये भांडुप प्रकल्प – 2537 हजार कोटी, करळी – 5811, कर्सेका – 1604, कांद्रे – 4293, मालाड 7107, धाराकीसाठी – 4636 हजार कोटी असा एकूण 25 हजार 988 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. सिमेंट काँक्रीटच्या 400 किमीच्या रस्त्यांसाठी सहा हजार कोटी, भांडुप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल 670 कोटी, सौंदर्यीकरणांच्या कामांसाठी एकूण 1750 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
































































