विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी तुमची साथ हवी- जयदत्त क्षीरसागर

339

केंद्रामध्ये जे सरकार आहे. तेच सरकार राज्यामध्ये येणार आहे. त्यामुळे विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी बहाद्दर मतदारांची साथ हवी आहे. विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका, पुढची पाच वर्षे हे तुमच्यासाठीच असणार आहे.आपल्या भविष्याचा विचार करून मला साथ द्या असे आवाहन जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजपा, रासप, शिवसंग्राम आणि मित्र पक्षाचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांचा प्रचाराचा झंझावात आज घाटसावळी भागामध्ये निर्माण झाला. घाटसावळी, बाभळखुंटा, जरूड, मन्यारवाडी, मौजवाडी, ब्रम्हगाव या गावात जाऊन धडकला. गावागावात शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले, आपण बीड विधानसभा मतदारसंघातील गावागावात शासनाच्या योजना पोहचवून त्या योजनांचा लाभ या गावाला मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. गेल्या पाच वर्षात जनतेच्या विकासासाठी आपण परिश्रम घेतले. आता परतफेड करण्याची वेळ आली आहे. पाच वर्षे निरंतर सेवा कोण देतो हे मतदारांनी ओळखून मतदान करावे, आम्ही पाच वर्षे जनतेच्या संपर्कात असतो, प्रत्येक विकासाचे काम आपण केले आहे. जे विकास कामे झाली ते समोर आहेत. केवळ आश्वासने दिली नाहीत याचेही मोजमाप झाले पाहिजे. कोणी गळ्यात हात टाकून रोटी, बोटी, चपटीचा प्रयोग करतील, त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, पुढचे पाच वर्षे तुमच्यासाठीच असणार आहे. केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असणार आहे. त्यामुळे विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी आम्हाला साथ द्या, धनुष्य बाणाचे बटन दाबून बीड विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकावा असे आवाहन जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुंडलिक खांडे, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, अरूण डाके, नितीन डाके, गोरख सिंगण, गणेश वरेकर, बप्पासाहेब घुगे, दीनकर कदम, सखाराम मस्के, अरूण बोंगाणे, झुंजार धांडे, अ‍ॅड.राजेंद्र राऊत, नामदेव खांडेकर आदी उपस्थित होते.

जयदत्त क्षीरसागर यांना समर्थन देण्यासाठी रोज तरूणांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहे. आज दीनकर कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवम सातपुते यांच्यासह पांडुरंग सातपुते, रामेश्वर जाधव, रवी डोंगरे, राजेश डोंगरे, शरद मिटकर, सुरज सातपुते, सदाशिव सातपुते, अशोक सातपुते, किशोर टेकाळे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

आपली प्रतिक्रिया द्या