Video – शेतकरी वाकून नमस्कार करू लागला; पाहा उद्धव ठाकरे काय म्हणाले

5871
uddhav-thackeray-sangali

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी तिथल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे भारावून गेलेले शेतकरी त्यांना वाकून नमस्कार करू लागले. त्यावेळी, ‘तुम्ही वाकायचं नाही. खंबीर उभं रहा. मजबूत उभं रहायचं. खचून जायचं नाही. लवकरात लवकर तुम्हाला कशी मदत करता येईल ते बघू’, या शब्दात उद्धव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारपासून सांगली दौऱ्यावर आहेत. इथे त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची बांधावर जाऊन भेट घेतली. त्यांच्या सोबत चर्चाकरून त्यांना धीर दिला. तसेच शिवसेनेतील स्थानिक पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून लागेल ती मदत देण्यास सांगितलं.

‘संपूर्ण महाराष्ट्रच सध्या विचित्र संकटात सापडला आहे. पण आपण सगळे मिळून त्यावर मात करू’, असंही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या