विरोधकांचं तोंड म्हणजे गटार, मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भान ठेवावे; संजय राऊत यांचे टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या विशाल मैदानावर आज सायंकाळी 6 वाजता शिवधनुष्याचा टणत्कार घुमणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. या सभेपूर्वी भाजपकडून सुरू असलेल्या बॅनरबाजीचा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. विरोधकांचं तोंड म्हणजे गटार आहे, अशा शब्दात राऊत यांनी टीकास्त्र सोडले.

विरोधकांचे तोंड म्हणजे गटार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी काय बोलावे, कसे बोलावे याचे भान त्यांनी ठेवले पाहिले. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांविषयी, त्यांनी जे काही मोठे काम करून ठेवलेय त्या विषयी तुमचा व्यक्तीगत द्वेष असू शकतो. पण अशा प्रकारच्या तुमच्या तोंडातून जर भिजलेले फटाके फुटणार असतील तर त्याची पर्वा आम्ही करत नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

शिवसेनेची भव्य सभा

मराठवाड्यामध्ये शिवसेनेची जी पहिली शाखा 37 वर्षांपूर्वी स्थापन झाली त्या पहिल्या शाखेचा आज वर्धापण दिन आहे आणि त्या वर्धापण दिनानिमित्त संभाजीनगरला शिवसेनेची भव्य सभा आहे. त्या सभेला शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतील आणि संबोधित करतील. सभेची तयारी गेल्या काही काळापासून जोरात सुरू असून संपूर्ण मराठवाड्यातून लाखो शिवसैनिक आजच्या सभेला येतील. बऱ्याच काळानंतर राज्याचे मुख्यमंत्री हे मुंबईच्या बाहेर जाऊन सभा घेत आहेत आणि याचे लोकांना आकर्षण आहे. राज्यात, देशात अनेक राजकीय घडामोडी घडत असून त्याविषयी उद्धव ठाकरे काय भाष्य करतीय या विषयी आपल्या सर्वांना उत्सुकता आहे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

प्रत्येक घटकपक्ष महाविकास आघाडीसोबत

सरकार स्थापन करताना जे छोटे घटकपक्ष आमच्याबरोबर होते, ते आजही आमच्याबरोबर आहेत. प्रत्येक घटकपक्ष महाविकास आघाडीसोबत असून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे, असेही राऊत यांनी म्हणाले. तसेच हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे सहकारी आमच्या परिवारातीलच असून त्यांच्याशी आमचा संवाद सुरू आहे. 10 तारखेला कोण कोणाला मतदान करतेय हे कळेल, असेही ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)