
हिरवा साप हळूहळू डोके वर काढत आहे. मटका बहाद्दर यांनी एवढा पैसा कुठून आणला. माणिकदादा पालोदकर सोबत राहून त्यांच्या डोक्यावर सत्तार चढले, सत्तारांनी दहशतवाद्यांना स्थान दिले. फर्दापूरच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवले. संभाजीनगर येथून लोकसभा माझ्यासमोर लढवून दाखवा. आम्ही प्रभाकर पालोदकर यांच्या सोबत निवडणूक लढवणार होतो. मात्र सत्तार उद्धव ठाकरेंच्या पाया पडले व शिवसेनेकडून तिकीट घेतले व निवडून आले.सत्तारांची ईडीकडे तक्रार करणार असून, त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले.
सत्तार पैशांच्या बळावर हे निवडणुका लढवतात…
शिवसेनेची सभा होऊ नये यासाठी अनेक प्रयत्न होतात. अब्दुल सत्तार म्हणजे रजाकार. ही तर निजामाची औलाद आहे. नगर परिषदेने पाच पट टॅक्स वाढवला. मुख्याधिकारी सत्तारांच्या घरची चाकरी करतात. येणार्या निवडणुकीत सत्तारांना त्यांची जागा आम्हीच दाखवणार. सिल्लोड-सोयगाव तालुक्यांत अतिवृष्टीची शेतकर्यांना काहीच मदत नाही. ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही, असे बोलणारे हे मंत्री आहे. मंत्री हा जबाबदार असतो. मात्र अब्दुल सत्तार बेजबाबदार हे आहे. स्वत:ची जहागिरी म्हणून इथल्या संस्था चालविल्या जातात. स्वत:च्या संस्थेतील 16 शिक्षक टीईटी घोटाळ्यात अडकले आहे. मतदारसंघात हिंदूंवर अन्याय होतो. भाजप व सत्तारांची साठगाठ आहे. उमेदवार कोणीही असेल तरी निवडून आणू. अब्दुल सत्तार पैशांच्या बळावर हे निवडणुका लढवतात, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.
40 गद्दार शिवसेना वाचवण्यासाठी नाही, तर संपविण्यासाठी बाहेर पडले; सुषमा अंधारे यांचा घणाघात
राज्यपालांना महाराष्ट्रातून हलवा…
राज्यातील टीईटी घोटाळ्याची चौकशीची मागणी आम्ही केलेली आहे.घोटाळे केले कोणी आणि अडकले निष्पाप. काळी टोपीवाले राज्यपाल छत्रपतींशी स्वत:ची तुलना करतात. असे राज्यपाल आम्ही सहन करणार नाही. राज्यपालांना हटवा महाराष्ट्र मोकळा करा अशा राज्यपालांना महाराष्ट्रातून हलवा. भाजपचा अड्डा राज्यपालांच्या ऑफिस मध्ये आहे. या सरकारला ध्येयधोरण नाही. उद्धव ठाकरेंनी 180 कोटी रुपयांची तरतूद किल्ले संवर्धनासाठी केली; मात्र या सरकारने त्याला स्थगिती दिली, असे मनीषा कायंदे म्हणाल्या.






























































