बालकांच्या कुटुंबीयांना शिवसेनेकडून एक लाखाची मदत – एकनाथ शिंदे

भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात झालेल्या अग्नीतांडवात दहा बालकांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेतील पीडित कुटुंबीयांना शिवसेनेकडून एक लाख रुपये देण्यात आले असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

”या याप्रकरणाची सहा सदस्यीय समितीमार्फत चौकशी सुरू आहे. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन याचा चौकशी अहवाल लवकरात लवकर येईल. त्यानंतर जे कुणी दोषी आढळतील त्यांची गय करण्यात येणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहीती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच राज्यातील सर्व रूग्णालयाचे फायर ऑडीट, इलेक्ट्रिक ऑडीट करण्याची ग्वाही शिंदे यांनी दिली. तसेच शिवसेने कडून बालकांच्या कुटुंबाला 1 लाख रुपयांची मदत करण्यात आली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या