सामना प्रतिनिधी । हिंगोली
धर्मांध मुस्लीमांनी हल्ला चढवुनही यंदाच्या वर्षी हिंदुत्वाचा बुलंद शंखनाद करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी जबरदस्त आयोजन केलेल्या भव्य कावडयात्रेमध्ये हजारो शिवसैनिक व शिवभक्त, हिंदुप्रेमी नागरिक सहभागी झाले. कळमनुरीहुन वीस कि.मी.चे अंतर पायी कापत हिंगोलीकडे निघालेल्या या कावडयात्रेत सर्वत्र फडकणारे भगवे ध्वज, हर हर महादेव, बम बम भोले, शिवसेना जिंदाबाद, जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणांची ललकारी घुमल्याने भगवे चैतन्य पसरले. तब्बल पंधरा ते वीस हजाराचा जन समुदाय कावडयात्रेसोबत सहभागी झाला होता.

बकरी ईदच्या नमाजानंतर धर्मांध मुस्लीमांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी आयोजीत केलेल्या कावड यात्रेवर व सहभागी शिवसैनिकांवर दगडपेâक केल्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलीसांच्या बोटचेपी, शेपुटघाल्या भुमिकेला थारा न देता जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी ही यात्रा निघणारच असा निर्धार केला. या निर्धाराला हजारो शिवसैनिक व शिवभक्त, हिंदुप्रेमी नागरिकांनी सहभागी होऊन जोरदार प्रतिसाद दिला. सकाळी कयाधु नदीच्या पाण्याचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, खासदार हेमंत पाटील यांनी विधीवत जलपुजन केल्यावर कावड कळमनुरीला पाठविण्यात आली. कळमनुरीच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिरामध्ये अभिषेक व यथासांग पुजा पार पडल्यावर प्रत्यक्षात कावडयात्रेला सुरुवात झाली. कळमनुरीचे लमानदेव मंदिर, बसस्थानक, मुख्य रस्ता या मार्गाने ही कावड हिंगोलीकडे मार्गस्थ झाली. कळमनुरी शहरात व्यापारी व हिंदु नागरिकांनी ठिकठिकाणी यात्रेचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. कळमनुरीहुन हिंगोलीकडे येतांना शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य फकीरा मुंडे यांनी हॉटेल ऋषीकेश येथे शाबुदाणा उसळ व खिचडीचे आयोजन केले होते. तसेच अन्य दानशुर मंडळींनी सहभागी भक्तांसाठी पाणी, सरबत, फराळाची व्यवस्था केली. रस्त्यात येतांना शिवणी, उमरा, खानापुर, सावरखेडा येथे या यात्रेचे व जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांचे स्वागत करण्यात आले. ही कावडयात्रा हिंगोली शहरामध्ये दाखल झाल्यावर शहराच्या सर्व भागातुन फेरी मारण्यात आली. त्यानंतर श्री ओम कयाधु अमृतधारा महादेव मंदिरावर महाआरती व पुजा करण्यात आली. या कावडयात्रेत सहभागी मंडळींनी कावडला खांदा देण्यासाठी एकच गर्दी केली होती.

शिवसेनेच्या जयजयकाराचे तसेच श्री महादेवाचे भक्तीगीत लक्ष वेधुन घेत होते. यासोबतच शिवसेना जिंदाबाद, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, बम बम भोले, उध्दव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा जबरदस्त घोषणा देण्यात आल्या. तब्बल दहा हजार शिवसैनिक व नागरिक कावडयात्रेचे टिशर्ट घालुन सहभागी झाल्याचे दिसुन आले. या यात्रेमध्ये शिवसेना खासदार हेमंत पाटील, जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जिल्हा समन्वयक दिलीप बांगर, माजी खासदार शिवाजी माने, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, संदेश देशमुख, डी.के. दुर्गे, सखाराम उबाळे, जि.प. सदस्य बाळासाहेब मगर, फकीरा मुंडे, राम कदम, उपसभापती अजय सावंत, लोकसभा सहसंपर्कप्रमुख डॉ. रमेश शिंदे, राजेंद्र शिखरे, प्रकाश घुगे, माजी सभापती रामेश्वर शिंदे, उध्दवराव गायकवाड, श्रीराम बांगर, किशोर मास्ट, अनिल देशमुख, अनिल देव, बलराम चौधरी, गजानन भोसले, नगराध्यक्ष उत्तम शिंदे, बंडु चोंढेकर, नामदेव राठोड, मारोतराव खांडेकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

























































