आदित्य ठाकरे नाशकात, ओल्या दुष्काळग्रस्त भागाची केली पाहणी

5725

अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. शिवसेना त्यांच्या मदतीसाठी धावली असून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी नाशिक जिल्ह्यात जाऊन तेथील शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी सरकारकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देऊ असे आश्वासनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात हैदोस घातला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. मका, सोयाबिन, कांदा, द्राक्ष बागांसह खरिप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. आदित्य ठाकरे यांनी सोमवारी नाशकात जावून नुकसानीची पाहणी केली. अवकाळी पावसामुळे धान्य सडले, तर काही वाहून गेले. आता काय करायचे अशा विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीवर हात ठेवून आदित्य ठाकरे यांनी त्यांना धीर दिला.

सोमवारी आमदार आदित्य ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी, चांदवड तालुक्यातील वडनेर भैरवगाव, मालेगाव तालुक्यातील टेहरे या ओल्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या अडचणीतील शेतकऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे राज्यात नैसर्गिक आपत्ती उद्भवली आहे, त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांना मदत करून त्यांना धीर देण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी गटनेते एकनाथ शिंदे, आमदार दादा भुसे, आमदार सुहास कांदे, संपर्कप्रमुख भाऊ चौधरी उपस्थित होते.

कोकणातील बळीराजाला आदित्य ठाकरे यांनी दिला धीर

आपली प्रतिक्रिया द्या