
कोकणात शेतकरी बांधव शेतीला पूरक फळबागा करतात. त्याच्यात वणवे लागतात. बागायती जळून खाक होतात त्यांना मदत मिळत नाही. त्यांचे निकष ठरवले नाहीत. वणव्यांपासून संरक्षण करण्यासाठी बागायतींच्या बाजूने चर खणण्याची गरज शिवसेना आमदार बाळा नर यांनी विधानसभेत व्यक्त केली.
नियम 293च्या प्रस्तावावर बोलताना बाळा नर यांनी आरे कॉलनीतील आदिवासी बांधवांच्या शेतीपासून कोकणातील शेतकऱयांच्या व्यथा मांडल्या. कोकणातील शेतकरी कधी कोणाकडे मागत नाही. अनेक संकटे सहन करतो. कणकवली, वैभववाडी राजापूर, देवगड या चार तालुक्यांत सर्व बाजूने मागासलेला भाग असून येथे जलसंधारणाची योजना राबवली तर विकास होईल. कोकणातील कृषी अधिकारी, जलसंधारण अधिकारी किती लक्ष देतात? याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे असे ते म्हणाले.
कोकणात माकडांचा वाढता उपद्रव
बिबट्यांचा आणि रानटी प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. रानटी गवत उगवते. त्यामुळे झाडे मारून टाकतात. कृषी अधिकारी व यंत्रणा काय करते? हे संकट मोठे आहे. राज्यात कोकणात वन्य प्राण्यांचा त्रास आहे. माकडे, गवे, रानडुकरांचा वाढता उपद्रव थांबवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकणात वणव्यांमुळे नुकसान
कोकणात शेतकरी बांधव शेतीला पूरक फळबागा करतात. त्याच्यात वणवे लागतात. त्यामुळे वणव्यांचा पाच एकर, दहा एकर क्षेत्रफळाचा आकार निश्चित करून बागायतीला चारही बाजूने चर मारले तर पाणी साचून वणव्यापासून संरक्षण होईल. कुंपणासारखी व्यवस्था होऊन संकट टळेल. असे बाळा नर म्हणाले.

























































