
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली. संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.
आज हिंदुस्थानचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी उत्तम चर्चा झाली. ही भेट खरोखरच अतिशय सुखद आणि मनाला स्पर्श करणारी होती, असे संजय राऊत यांनी म्हटले. अर्थात दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट नक्की कुठे झाली याबाबत तपशील मिळालेला नाही.
Had the honour of meeting former Vice President of India, Shri Jagdeep Dhankhar Ji today.
Enjoyed a wonderful conversation!
It was a truly delightful and heartwarming meeting. 🙏 pic.twitter.com/gjNSLt6dhg— Sanjay Raut (@rautsanjay61) March 8, 2026
जगदीप धनखड गेल्या वर्षी जुलै महिन्यात उपराष्ट्रपती पदाचा अचानक राजीनामा दिला होता. तब्येतीच्या कारणांचा हवाला देत त्यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पदभार सोडला होता. त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. धनखड यांनी सरकारच्या दबावाखाली येऊन राजीनामा दिल्याचा आरोप त्यावेळी विरोधी पक्षांनी केला होता.
मी कधीच म्हणालो नाही की मी आजारी आहे; उपराष्ट्रपती पदाच्या राजीनाम्यावर जगदीप धनखड यांनी सोडले मौन

























































