शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nagar-election

सामना प्रतिनिधी । नगर

नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सध्या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. शहरातील नक्षत्र लॉन येथे सुरू असलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी इच्छुक उमेदारांची गर्दी जमली आहे.

नगर महानगरपालिकेच्या निवडणुका 9 डिसेंबर रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम निश्चित केला आहे. आज शहरातील नक्षत्र लॉन येथे दुपारपासून मुलाखतीला सुरुवात झाली आहे. एकूण 17 प्रभाग असून 68 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी शिवसेनेने सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आज इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेतले जात आहेत. तसेच प्रत्येक प्रभागातील इच्छुक सदस्यांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया संध्याकाळपर्यंत सुरूच राहणार आहे.

शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या पहिल्यापासूनच असल्यामुळे अजूनही ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या उपस्थितीमध्ये या मुलाखती पार पडत आहेत.