
अभय मिरजकर । लातूर
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या लातूर दौऱ्यावर सर्व राजकिय पक्ष, संघटनांचे सर्व सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या झंजावाताची मराठवाड्यातील सुरुवातच लातूरमधून होत आहे. त्यामुळे सबंध मराठवाड्यातील राजकिय जाणकार याकडे तर विशेष लक्ष ठेऊन आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे राजगुरुनगर येथील सभेतील संपूर्ण भाषण
लातूर जिल्ह्यात यापुर्वी उद्धव ठाकरे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आले होते. जिल्ह्यातील अनेकांना मदत वाटप करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यातुन लोकसभा निवडणूकीचे बिगुलच वाजवले जात आहे. त्यामुळे या वेळी उध्दव ठाकरे काय बोलणार, कुणावर आसूड ओढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेळावा गटप्रमुख बिएलओ यांच्या मार्गदर्शनासाठी असला तरी सर्वसामान्य नागरिक उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजगुरुनगर येथील सभेचे फोटो
सकाळी 10.30 वाजता उद्धव ठाकरे यांचे लातूर विमानतळावर आगमन होणार आहे. लातूरातील मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख सभागृहात होणाऱ्या या मेळाव्यास त्यांच्या सोबत मिलींद नार्वेकर, शिवसेना नेते, खासदार चंद्रकात खैरे, विश्वनाथ नेरुरकर उपस्थित राहणार आहेत. लातूर येथील मेळाव्यानंतर ते बीड येथील मेळाव्यासाठी रवाना होणार आहेत. शिवसेना नेते खासदार चंद्रकात खैरे हे लातूरात नियोजनासाठी तळ ठोकून आहेत. मेळावा यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी परिश्रम घेत आहे.

























































