
ईडीच्या अन्यायकारक कारवाईनंतर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना सीमाभागातूनही पाठिंबा मिळत आहे. देशभरात चुकीच्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून होणाऱया कारवाया थांबवून देशाची लोकशाही अबाधित राहावी, यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करीत विरोधकांचा आवाज दाबण्याच्या हेतूने आणि सूडाच्या भावनेने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे, हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नाही. केंद्रीय तपास यंत्रणांचा सूडबुद्धीने वापर होत असलेल्या प्रकरणात लक्ष घालून हे प्रकार थांबविले जावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, सूरज कुडूचकर, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, संजय शिंदे, वर्षा अजरेकर, सुधा भातकांडे, भागोजीराव पाटील, मनोहर हलगेकर, गीता हलगेकर, सचिन गोरले, महेश टंकसाळी, राजकुमार बोकडे, दिलीप बैलूरकर, राजू पावले, शांताराम होसूरकर आदी उपस्थित होते.































































