आणि ही बोगस लोकं आम्हाला हनुमान चालीसा ऐकवणार, संजय राऊतांचा निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sanjay-raut-press

‘मातोश्री’वर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असा गाजावाजा करणारे राणा दांपत्य सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. नवनीत राणा यांचं बर्थ सर्टिफिकेट खोटं असल्याचा रिपोर्ट त्यांनी ट्विट केला आहे.

‘हे लोक फसवणारे आणि बोगस आहेत.. हे लोक आम्हाला हनुमान चालीसा सुनावणार..’ असे त्यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एक स्क्रीन शॉट आहे ज्यामध्ये नवीनत कौर यांनी हिंदू मोची जातीचा खोटा दाखला बनवण्यासाठी खोटा जन्माचा दाखला, खोटा शाळा सोडल्याचा दाखला, खोटे रेशकार्ड दाखला दिल्याचे समोर आले आहे.