कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामावरून शिवसेना आक्रमक, निवेदन देत केली कारवाईची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्ध्याच्या साहूर येथील जाम नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट केल्याबाबत तसेच नदीचे खोलीकरण व्यवस्थित न केल्याचा आरोप करत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) चे पदाधिकारी आष्टी तहसीलदार कार्यालयात धडकले. यावेळी शिवसैनिकांनी कोल्हापुरी बंधारा कसा निकृष्ट दर्जाचा आहे याचा व्हिडीओ काढून पुरावा दाखविला. यावेळी तातडीने संबंधित ठेकेदारावर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.