कचरा, नालेसफाई, मोकाट गुरांच्या प्रश्नांवरून शिवसेना आक्रमक

अमरावतीच्या प्रभागां-प्रभागांमध्ये साचलेल्या कचऱयाचे साम्राज्य, दुर्गंधी, नालेसफाई बोजवारा, वाढते प्रदूषण या सर्वांमुळे पावसाळय़ात साथीचे आजार शहरात पसरण्याचा धोका असताना पालिकेकडून कुठलीही प्रतिबंधात्मक उपाययोजना किंवा फवारणी नाही. अनधिकृत बांधकामे, मोकाट जनावरांचा, कुत्र्यांचा हैदोस याचा कडेलोट झाल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महानगरप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वाखाली अमरावती महापालिकेवर कचऱयांच्या लोटगाडय़ासह मोर्चा नेत ‘वाजवा रे वाजवा’ आंदोलन करत प्रशासनाचा जाहीर निषेध केला. यावेळी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. कारभार सुधारला नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला.

अमरावती महापालिकेवर मागील पाच वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता आहे तर गेल्या एक वर्षापासून प्रशासकाकडून कारभार चालवला जात आहे. मात्र गेल्या सहा वर्षांत सर्वसामान्यांच्या समस्या कमी होण्याऐवजी त्यात भर पडत चालली आहे. गेल्या सहा वर्षांपासून कचऱयाच्या प्रमुख समस्येसह नालेसफाई, दुर्गंधी, मोकाट गुरे, मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नांवरून लोकांच्या संताप अनावर झाला होता. त्याला शिवसेनेने मोर्चा काढून वाट मोकळी करून दिली. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, माजी आमदार धाने पाटील, जिल्हाप्रमुख मनोज कडू, श्याम देशमुख, महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रीती बंड, मनीषा टेंभरे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र निर्मल, नरेंद्र पडोळे, विधानसभा संघटक नितीन हटवार, उपमहानगरप्रमुख संजय शेटे, पंजाबराव तायवाडे, सुनील राऊत, विजय ठाकरे, असलम खान पठाण, याया खान, नगरसेवक प्रशांत वानखडे, डॉ. तायडे, ललित झंझाड, जयश्री कुर्हेकर, युवती सेना जिल्हाप्रमुख पीयूषिका मोरे, माजी नगरसेवक प्रदीप बाजड, प्रवीण हरमकर, रामाभाऊ सोळंके, शहरप्रमुख राजश्री जठाळे, स्वाती निस्ताने, प्रतिभा बोपशेट्टी, वंदना घुगे, वैशाली विधाते, वैशाली राणे, कांचन ठाकूर, सारिका जैस्वाल, मोहन क्षीरसागर, राहुल माटोडे, सुरेश चौधरी, आशीष विधाते, बाळासाहेब विघे, संजय गव्हाडे, शरद वानखडे, बाल्या पीठे, विनोद मंडळकर, प्रमोद भारस्कर, सचिन ठाकरे, अतुल सावरकर, शिवराज चौधरी, प्रतीक कळसकर, पवन दळवी, अभिषेक तायडे, अभिषेक पवार, अक्षय चऱहाटे, स्वप्नील सरडे, मयूर गव्हाणे, विवेक पवार, चेतन काळे, मिथुन सोळंके, नरेश नागमोते, केतन मासातकर, वसंत गौरखेडे, पंकज छत्रे उपस्थित होते.