महागाईचा डोंगर रचला.. खिसा आमचा खाली केला; वसई, नवी मुंबई, भाईंदरमध्ये भाववाढीविरोधात शिवसेनेचा जनआक्रोश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेली वाढ आणि त्यामुळे भडकलेल्या महागाईचा निषेध करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वसई, नवी मुंबई आणि भाईंदरमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. “महागाईचा डोंगर रचला… खिसा आमचा खाली केला, इंधन दरवाढ थांबवा… जनतेला दिलासा द्या” अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. त्यामुळे सर्व परिसर दणाणून गेला. या जनआक्रोशात शिवसैनिकांबरोबर स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवसैनिकांनी मेलोडी चॉकलेट वाटून दरवाढीचा निषेध केला.

वसई

विरार रेल्वे स्थानकासमोर शहरप्रमुख उदय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात जिल्हाप्रमुख प्रभेश राजत, जिल्हा सचिव आनंद चौथे, शहर संघटक शीला लबके, उपशहर संघटक रोशनी जाधव, जयश्री चव्हाण, विभाग संघटक प्राजक्ता जांभळे, सुनीता सोनजे, साक्षी जाधव, रजनी कोठावळे, अॅड. गिरीश दिवाणजी, सुनील चव्हाण, उपशहर समन्वयक रमेश गुरव, सचिव राहुल धुरी, जितेंद्र खाडे, अजय पिंगळे, दिनेश आदवडे, शिवराम तळेकर आदी सहभागी झाले होते.

नवी मुंबई

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तुर्भे येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आणि प्रवीण म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले. यामध्ये जिल्हा संघटक रंजना शिंद्रे, विधानसभाप्रमुख अतुल कुलकर्णी, राज्य संघटक अवधेश शुक्ला, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, संजय तुरे, किशोर विचारे, एकनाथ दुंबरे, मनोज इसवे, सुनील गव्हाणे, महेश कोटीवाले, वैशाली घोरपडे, निशा पवार, उषा रेणुके, प्रणाली कदम, वंदना गोडसे, नंदा कोटे, आशा शिंदे आदी उपस्थित होते.

भाईंदर

जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला जिल्हा संघटक नीलम ढवण आणि जिल्हा समन्वयक मनोज मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सुभाष केसरकर, शहरप्रमुख प्रशांत सावंत, संभाजी पालांडे, दीपक तलवडे, विजय वाळंज, सदानंद घोसाळकर, रमेश शेळके, संतोष ओव्हे, अमित माथुर, सुनील सुवे, नंदू घरत, श्रेया सावळे, क्षमा गांधी, कांचन लाड, सुप्रिया घोसाळकर, हेमलता जोशी, कल्पना शिगवण, कल्पना पारंगे, मनीषा भोपळे, दीप म्हात्रे, दीपेश गावंड, दर्पेश शेळके, बाजीराव दांडे आदी सहभागी झाले होते.