
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मंगळवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं. हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत आमदारांना ताब्य़ात घेतले व जबरदस्ती पोलीस गाडीत बसवले.
मोगलाई आहे काय? हुकूमशाहीचा जाहीर निषेध!
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयाच्या दारात संविधानिक मार्गाने आंदोलन करत असताना अत्यंत हीन व क्रूरतेने पोलिस बळाचा वापर करून अटक केली. हा कसला न्याय आहे? हे कसले प्रशासन आहे?
आरक्षण मिळेपर्यंत सनदशीर मार्गाने आम्ही मराठा… pic.twitter.com/4jagJPj7eB
— Kailas Patil (@PatilKailasB) November 1, 2023
शिवसेनेचे आमदार कैलास पाटील व राहुल पाटील यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कैलास पाटील यांनी त्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सरकारच्या या हुकुमशाहीचा निषेध केला आहे.
”मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयाच्या दारात संविधानिक मार्गाने आंदोलन करत असताना अत्यंत हीन व क्रूरतेने पोलिस बळाचा वापर करून अटक केली. हा कसला न्याय आहे? हे कसले प्रशासन आहे? मोगलाई आहे काय? हुकूमशाहीचा जाहीर निषेध! आरक्षण मिळेपर्यंत सनदशीर मार्गाने आम्ही मराठा बांधवांसोबत लढत राहू.. हक्क मिळवून घेऊ”, असे ट्विट कैलास पाटील यांनी केले आहे. सोबत त्यांनी त्यांना ताब्यात घेतल्याचा व्हिडीओही शेअर केला आहे.

























































