Kankavli News – रद्द करा, रद्द करा… पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करा; कणकवलीत पेट्रोल दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये तीन रूपयांची वाढ करण्यात आली. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कणकवली पटवर्धन चौक येथे आंदोलन करण्यात आले. कणकवली बसस्थानक ते पटवर्धन चौकापर्यंत शिवसैनिकांनी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) घोषणाबाजी देत मोर्चा काढला. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

या आंदोलनात महिला जिल्हाप्रमुख मधुरा पालव, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, राजू राठोड,अजित काणेकर, तेजस राणे ,नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे,नितीन राऊळ,अरुण परब, बबली राणे, आबू मेस्त्री, विलास गुडेकर, योगेश मुंज, शुभम परब, संतोष चव्हाण, विलास नाईक, चेतन पाटील, फैयाज शेख, सहदेव नाईक, निळकंठ राणे आदी शिवसैनिक (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपस्थित होते.

पेट्रोल डिझेल दरवाढीची मोठी झळ सर्वसामान्याना बसणार आहे. जरी तीन रूपयांची दरवाढ झाली असली तरी पुढील काळात पंचवीस ते तीस रूपयांची दरवाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी आत्ताच इंधन दरवाढी विरोधात रस्त्यावर उतरावे असे, आवाहन शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी आमदार वैभव नाईक यांनी केले. तसेच अजूनही सत्ताधारी मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये वीस ते पंचवीस वाहने असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.