370 प्रमाणेच राम मंदिरासाठी धाडसी पाऊल उचला – उद्धव ठाकरे

941
uddhavji-new-photo11

जम्मू-कश्मीरमधून 370 हटवण्यासाठी केंद्र सरकारने जे धाडसानं पाऊल उचललं तसंच एक धाडसी पाऊल राम मंदिरासाठी उचलावलं अशी आमची अपेक्षा असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. बेस्टच्या ताफ्यात मिनी बस दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

‘राम मंदिरासाठी शिवसेना पहिल्यादिवसापासून आग्रही आहे. बाबरी पाडली त्यावेळी देखील संपूर्ण देशात शिवसेनाप्रमुखांनी त्याची जबाबदारी घेतली होती. 92 पासून हा विषय सुरू आहे. आणखी आम्ही किती वर्ष थांबायचं?’ असा सवाल त्यांनी यावेळी केला.

‘कोर्टात हा विषय अंतिम टप्प्यात आला आहे असं ऐकतो आहोत. न्यायदेवतेला आमची विनंती आहे की लवकरात लवकर जो काही निर्णय असेल तो द्यावा’, अशा शब्दांत त्यांनी विनंती केली.

तसेच राम मंदिरासाठी सरकारकडून अपेक्षा त्यांनी बोलून दाखवल्या. सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहेत की जसं 370 बाबत कोर्ट किंवा इकडे-तिकडे न बघता आपल्या अधिकारात निर्णय घेतला आणि आपलं कश्मीर जो हिंदुस्थानचा अविभाज्य घटक होता, आहे आणि राहिल त्यासाठी केंद्र सरकारने जे धाडसानं पाऊल उचललं तसंच एक धाडसी पाऊल राम मंदिरासाठी उचलावं अशी आमची अपेक्षा असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं

आपली प्रतिक्रिया द्या