युतीच्या विरुद्ध गद्दारी करणाऱ्या या हरामखोरांना नक्कीच धडा शिकवू – उद्धव ठाकरे

3010

उज्ज्वल महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न भक्कमपणे वास्तव्यात उतरविण्यास शिवसेना-भाजप युती सज्ज आहे. त्यामुळे आता नासक्या आंब्याना या निवडणुकीत बाहेर फेकून द्या असे  आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उरण येथील जाहीर सभेत केले. शनिवारी उरण विधानसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या प्रचारार्थ उरण-बोकडवीरा येथे आयोजित जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप बंडखोराने जबरदस्त फटकारले. ‘आमचे ते आमचे आणि तुमचे ते ही आमचे असा स्वार्थी विचार करून युतीच्या विरुद्ध गद्दारी करणाऱ्या या हरामखोर अवलादीचा शिवसेना नक्की बंदोबस्त करेल’, असे सांगून अंगावर आलेल्याला शिवसेना शिंगावर घेते हा इतिहास असल्याचे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आगमनाने उरणमध्ये भगवे वादळ दाखल झाल्याचे दिसत होते. शिवसेना झिंदाबाद…हमसे जो टकरायेगा..मिट्टी मे मिल जायेगा.. अशा गगनभेदी घोषणांनी शिवसैनिकांनी आसमंत  दणाणून सोडले होते. भर पावसात भगव्या चैतन्याने उरणचे वातावरण भारावून गेले होते.’सौ सोनार की..एक लोहार की” या म्हणीचा प्रत्येय उद्धव साहेबांच्या भाषणातील एकेका वाक्या बरोबर येत होता. उरणच्या जनतेला न्याय फक्त शिवसेनाच देऊ शकते या उद्धव साहेबांच्या विश्वासाने उरणच्या शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारले आहे. ‘नव्या सरकारच्या स्वप्नासाठी मला उरणचा आमदार हवा असून काँग्रेस-राष्ट्रवादीची सुपारी घेऊन युतीचा धर्म बुडवायला सज्ज झालेल्या गळक्या बालदीला कायमचे उपडे घाला असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी मतदारांना केले. भर पावसात भिजत सुमारे चार हजारांच्या गर्दीने आज उद्धव साहेबांच्या विचारांचा मंत्र ऐकून घेतला.

या प्रचार सभेत उत्तर रायगड संपर्क प्रमुख दत्ता दळवी, खासदार श्रीरंग बारणे, उरण विधानसभेचे उमेदवार आमदार मनोहर भोईर यांची तडाखेबंद भाषणे झाली.यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर,महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा ठाकरे,अनघा कानेटकर, माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर,पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील,ग्राहक संरक्षण कक्षाचे रमेश म्हात्रे,मोतीराम ठोंबरे, विजय भोईर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.या जाहीर सभेत शेकापचे माजी तालुका चिटणीस महादेव घरत,मनसेचे उरण पूर्व विभाग प्रमुख रुपेश पाटील,कविता पाटील यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचे उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत स्वागत केले.

आपली प्रतिक्रिया द्या