Shiv Sena विदर्भातील प्रभारी महिला शिवसेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिह्यांतील महिला शिवसेना पदाधिकाऱयांची प्रभारी नियुक्ती जाहीर करण्यात आली असून सदर नियुक्ती ही होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन प्रभारी करण्यात आलेली आहे. पदाधिकाऱयांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन सदर नियुक्त्या कायम करण्यात येतील, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

नागपूर जिल्हा
सुरेखा खोब्रागडे आदमने, जिल्हा संघटक- नागपूर मध्य, नागपूर पूर्व, नागपूर उत्तर; सुशीला पाटील नायक, जिल्हा संघटक-नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर पश्चिम, नागपूर दक्षिण; मंगला गवरे, शहरसंघटक- नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर पश्चिम, नागपूर दक्षिण; सुरेखा गाडेकर, शहरसंघटक- नागपूर मध्य, नागपूर पूर्व, नागपूर उत्तर; विजेता कांबळे, जिल्हा समन्वयक- नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर पश्चिम, नागपूर दक्षिण; कांचन सालवे, जिल्हा समन्वयक- नागपूर मध्य, नागपूर पूर्व, नागपूर उत्तर; वैशाली उदापूरकर, उपजिल्हासंघटक- नागपूर मध्य, नागपूर पूर्व, नागपूर उत्तर; भाग्यश्री माथनकर, उपजिल्हासंघटक – नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर पश्चिम, नागपूर दक्षिण; सर्वेश यादव, विधानसभा संघटक- नागपूर दक्षिण- पश्चिम; क्षमा निमसरकार, विधानसभा संघाटक- नागपूर दक्षिण; फरहिन खान, विधानसभा संघटक- नागपूर पश्चिम; अपर्णा साखरकर, विधानसभा संघटक- नागपूर मध्य; तृप्ती पशीने, विधानसभा संघटक- नागपूर पूर्व, रेखा हारोडे, विधानसभा संघटक- नागपूर उत्तर.

भंडारा-गोंदिया जिल्हा
रश्मी पातुरकर, जिल्हासंघटक- विधानसभा-भंडारा, तुमसर, साकोला; भारती गावंडे, जिल्हासंघटक- विधानसभा-गोंदिया, तिरोरा; करुणा कुर्वे, जिल्हासंघटक- विधानसभा-अर्जुनी-मोरगाव, आमगाव.

चंद्रपूर जिल्हा
उज्ज्वला नलगे, जिल्हासंघटक- विधानसभा-चंद्रपूर, बल्लारपूर, राजूरा; नर्मदा बोरीकर, जिल्हासंघटक- विधानसभा-भद्रावती, ब्रह्मपुरी, चिमूर.

गडचिरोली जिल्हा
छाया पुंभारे, जिल्हासंघटक- तालुके-गडचिरोली, कुरखेडा, वडसा, आरमोरी, धानोरा, कोरची; करुणा जोशी, जिल्हासंघटक- तालुके-अहेरी, मुलचेरा, ऐटापल्ली, भामरागड, सिरोंचा, चार्मोशी.

जिल्हा संपर्कप्रमुख जाहीर
मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वर्धा, नागपूर (ग्रामीण), परभणी व यवतमाळ जिल्हय़ाकरिता जिल्हा संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
बाळा राऊत (जिल्हा संपर्कप्रमुख) – वर्धा जिल्हा; मधुकर देशमुख (जिल्हा संपर्कप्रमुख) – नागपूर ग्रामीण; राजेंद्र साप्ते (जिल्हा संपर्कप्रमुख) – परभणी जिल्हा; रामचंद्र ऐगडे (जिल्हा संपर्कप्रमुख) – यवतमाळ जिल्हा.

वर्धा जिल्हा
संगीता कडू, जिल्हासंघटक- विधानसभा-वर्धा, हिंगणघाट; स्वाती कुचे, जिल्हासंघटक- विधानसभा-आर्वी, देवळी-पुलगाव; भारती कोटंबकर- उपजिल्हासंघटक- वर्धा विधानसभा; सुनीता मोहोड, उपजिल्हासंघटक- देवळी-पुलगाव विधानसभा; वनिता धामंदे, जिल्हा समन्वयक- विधानसभा-वर्धा, हिंगणघाट; सीमा गलांडे, शहरसंघटक- हिंगणघाट विधानसभा; संगिता गायकवाड, विधानसभा समन्वयक- वर्धा विधानसभा; नलिनी सयाम, विधानसभा समन्वयक- हिंगणघाट विधानसभा; दुर्गा साठवणे, विधानसभा संघटक- वर्धा विधानसभा; मंदा चौधरी, विधानसभा संघटक- हिंगणघाट विधानसभा; माधुरी खडसे, तालुकासंघटक- हिंगणघाट तालुका; मंगला पाटील, तालुकासंघटक- पुलगाव तालुका.

सदस्य नोंदणी अभियानाला मुदतवाढ
मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी 16 ते 30 एप्रिल, 2022 रोजी पर्यंत युवासेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान जाहीर केले होते. नोंदणी अभियानास वाढता प्रतिसाद मिळता या सदस्य नोंदणी अभियानाला मुदतवाढ दिली असून रविवार, 8 मे 2022 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत सदस्य नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.

विलेपार्ले विधानसभेतील युवासेना शाखा युवा अधिकारी जाहीर
मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विलेपार्ले विधानसभेतील शाखा क्र. 82च्या युवासेना शाखा युवा अधिकारीपदी जय मोदी यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयाचे काम बघून कायम करण्यात येतील, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आले.