ठाण्याच्या शिवाईनगरात बाराशे घरांमध्ये पाइप गॅस, शिवसेनेच्या पाठपुराव्यास यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena-logo-new

सामना प्रतिनिधी, ठाणे

शिवाईनगरमधील बाराशे घरांमध्ये महानगर गॅस पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा सुरू करण्यात आला असून ऐन दिवाळीत स्थानिक नागरिकांना अनोखी भेट मिळाली आहे. या सुविधेमुळे गॅसला नंबर लावण्याची कटकट कायमची संपली असून महिलांची मोठी सोय झाली आहे. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी महानगर गॅसकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे दिवाळीत शिवाईनगरमध्ये थेट घरपोच पाइपलाइनद्वारे गॅस उपलब्ध झाला आहे.

शिवाईनगरमधील जय भोलेनाथ, श्रीगणेश, पृष्णदर्शन, कन्हैया, इंद्रप्रस्थ, तिरुपती, धनेश्वर या सोसायटय़ांमध्ये राहणाऱया रहिवाशांना लाभ होणार आहे. शिवाईनगर म्हाडा बैठी वसाहत येथेदेखील गॅस पुरवठय़ाच्या कामाची सुरुवात होणार आहे. आज या कामाचा शुभारंभ खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, जास्तीत जास्त नागरिकांना महानगर गॅस पाइपलाइनचा लाभ मिळावा यासाठी मी प्रयत्नशील आहे. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, नगरसेविका परिषा सरनाईक, रागिणी बैरीशेट्टी, जयश्री डेविड, शाखाप्रमुख पुंदन घोसाळकर, पत्रकार अनिल ठाणेकर उपस्थित होते.

summary- shivai nagar residents got pipe gas