
स्काऊट हॉल शिवाजी पार्क येथे सुरू असलेल्या इंडियन ऑइल व भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत 30व्या वरिष्ठ मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या आंतर क्लब सांघिक गटात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ना. म. जोशी मार्ग संघाने जेतेपद पटकावले.अंतिम लढतीत कामगार कल्याण मंडळ संघाने शिवतारा संघाचा 2 -1 असा पराभव करून विजयला गवसणी घातली. अमोल सावर्डेकरने मनोज कांबळेवर 21 -6 , 22 -11 अशी सहज मात केली. ओमकार नेटकेने राहुल सोळंकीला 21 -6 ,0 -25 , 15 -10 असे हरविले. दुहेरीच्या सामन्यात मात्र, शिवताराच्या विवेक भारती व अतुल पेटकर जोडीने सुपेश कामतेकर व सम्राट मोहिते जोडीवर 14 -17 , 25 -0 , 25 -17 असा अटीतटीच्या लढतीत विजय मिळविला.




























































