शिवभोजन थाळीच्या तीन केंद्रांचा परळीत शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडी सरकारने राज्यात सुरू केलेल्या शिवभोजन थाळीला परळी शहरात आज शुभारंभ करण्यात आला.यावेळी एकूण तीन केंद्रांद्वारे हे शिवभोजन गरजूंसाठी उपलब्ध होणार आहे. यामध्ये वैद्यनाथ मंदिर परिसरातील अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील स्व. पंडित अण्णा मुंडे शेतकरी भोजनगृह आणि रेल्वे स्थानकासमोरील पंचवटी भोजनालय या तीन ठिकाणी हे केंद्र असणार आहेत.

या केंद्राद्वारे लॉकडाऊनच्या काळात केवळ पाच रुपये प्रमाणे गरजूंना भोजनाचे डबे पुरवले जाणार असून प्रत्येक केंद्रातून 100 असे एकूण 300 डबे रोज पुरवले जाणार आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारच्या वतीने राज्यात शिवभोजन थाळीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सुरुवातीला ही योजना जिल्हास्तरावर होती. धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना बीड जिल्ह्यात तालुका स्तरावर ही योजना सुरू करण्याबाबत विनंती केली होती. या योजनेची सुरुवात आज परळीत करण्यात आली आहे.