
सामना प्रतिनिधी । नगर
शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल दिवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजकुमार शर्मा यांच्या हस्ते महापूजा करून करण्यात आला. यावेळी मिरवणुकीमध्ये विविध वेशभूषा केलेली मुले सहभागी झाली होते. नेता सुभाष चोक येथे शिवसेनेच्या वतीने मिरवणुकांचे स्वागत उपनेते अनिल राठोड यांनी केले. यावेळी सहभागी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे सर्व नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

दिवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजकुमार शर्मा.
































































