शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी 2023’ चा मानकरी, जिंकली मानाची गदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
चंद्रकांत पालकर, पुणे

पुण्यात रंगलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवान शिवराज राक्षे याने विजय मिळवत महाराष्ट्र केसरी 2023 होण्याचा मान मिळाला आहे. अंतिम सामन्यात शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला काही मिनिटातंच चितपट करत विजय मिळवला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी यावेळी चूरशीची झाली. पण त्यानंतर शिवराजने महेंद्रला चीतपट केले आणि महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवराज आणि महेंद्र हे दोघेही पुण्याच्या तालमीतच तयार झाले आहेत. वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या कात्रज येथे असेलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीत या दोघांनी कुस्तीचे धडे गिरवले. त्यामुळे वस्ताद काका पवार यांच्या शिष्याने यंदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)