तिळाचे पदार्थ संकल्पनेवर परळमध्ये स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना शाखा क्रमांक 203 च्या वतीने परळमध्ये पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांनी फक्त तिळाचे पदार्थ बनवायचे आहेत. आज 30 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता आर. एम. भट हायस्कूल येथे ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे आयोजन, युवासेना महाराष्ट्र राज्य उपसचिव शार्दुल म्हाडगुत, शाखा युवा अधिकारी सागर देवगडकर यांनी केले आहे.