
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी 8 जून रोजी संभाजीनगर शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा होणार आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली असून सोमवारी पोलीस आयुक्तांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. संभाजीनगरात या सभेसाठीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
शिवसेना संभाजीनगर शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा मराठवाडा संस्कृतिक मंडळावर सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या सभेला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.




























































