शिवगर्जना, आज शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा बनलेला शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा आज दणक्यात साजरा होईल. महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून हा मेळावा गर्दीचा नवा उच्चांक नोंदवणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. ‘अच्छे दिना’चा स्वप्नभंग झालेल्या महाराष्ट्राला पर्यायाने देशाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे साऱयांचे लक्ष लागून राहिले आहे. तेलाचा भडका, महागाईचा तडाखा, महिलांचे शोषण, दुष्काळाची आग, शेतकऱयांच्या आत्महत्या आणि अयोध्येत राममंदिर या मुद्दय़ांवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे देशाचे कान लागले आहेत. अवघा देश या ‘शिवगर्जने’ची वाट पाहतोय.

अयोध्या दौऱ्याकडे लक्ष
अयोध्येत राममंदिर हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. खुद्द उद्धव ठाकरे राममंदिराची वीट रचण्यासाठी अयोध्येला जाणार आहेत. ‘चलो अयोध्या’चे फलक सर्वत्र झळकत आहेत. उद्याच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे अयोध्या दौऱयाच्या तारखा घोषित करणार काय, याविषयी सर्वत्र उत्सुकता आहे.

स्थळ : शिवतीर्थ, दादर
वेळ : सायंकाळी 6 वा.