शिवसेनेच्या वतीने शेकडो वारकऱ्यांना फराळ

107

सामना प्रतिनिधी, बीड

आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाचे दर्शन घेऊन पंढरपूरहून गावाकडे परतणाऱ्या वारकऱ्यासाठी बीडमध्ये शिवसेनेच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी या वर्षी ही वारकऱ्यांची फराळाची व्यवस्था केली.

वारीसाठी पंढरपूरला गेलेले हजारो वारकरी एकादशीच्या दिवशी परतीच्या प्रवासाला लागतात. गावाकडे परतत असताना त्यांची सेवा करण्यासाठी माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप हे गेल्या 25 वर्षांपासून वारकाऱ्याची फराळाची सोय करतात या वर्षी ही शिवसेनेच्या वतीने अनिल जगताप यांनी वारकऱ्यासाठी फराळाची सोय केली हजारो वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला थकून आलेल्या वारकऱ्यांना शिवसेनेचा फराळ मोलाचा ठरत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या