मालवणातील पूरगस्तांना शिवसेनेचा ‘एक हात मदतीचा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक हात मदतीचा’ या उपक्रमातून शिवसेना भारतीय कामगार सेनेच्या वतीने मालवणातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. दरम्यान, हडी येथे शॉर्टसर्किटने घराला आग लागून नुकसान झालेल्या लवू कावले कुटुंबियांनाही जीवनावश्यक साहित्य आणि आर्थिक मदत देण्यात आली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पूरग्रस्त भागांना भेट देऊन मदत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शिवसेना भारतीय कामगार सेनेच्या वतीने राज्यभरातील पूरग्रस्तांना मदत देण्यात येत आहे. पूरस्थितीमुळे मालवण तालुक्यातील  पाणखोल जुवा, बंडास जुवा, खोत जुवा, हडी खालची वाडी, काळसे बागवाडी येथे पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने आर्थिक नुकसान झाले होते. हडी पाणखोल जुवा, बंडास जुवा, हडी खालची वाडी, काळसे बागवाडी येथील पूरग्रस्तांना अगरबत्ती, तांदूळ, बिस्कीट पुडे, चटई, चादर, बेडशीट, टॉवेल, साखर, यासह अन्य जीवनावश्यक साहित्यासह लहान मुलांसाठी वह्या, पेन, कंपास शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. तसेच हडी येथील लवू कावले यांच्या घराला शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली होती. गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. या घराचीही पाहणी करत जीवनावश्यक साहित्य देऊन या टीमने आर्थिक मदतही केली. पूरग्रस्तांना शासकीय मदत मिळण्यासाठी तलाठी यांनी पंचनामा केलेला आहे. शासकीय आर्थिक मदतीबरोबर केरोसीन मिळण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा केला आहे. लवकरच केरोसीन पुरविले जाईल असे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले.

रविवारी भारतीय कामगार सेना हिंदुजा हॉस्पिटल युनिटची टीम जीवनावश्यक साहित्य घेऊन मालवणात दाखल झाली.यावेळी मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, अध्यक्ष योगेश कापडोस्कर, अमित भाटे, संतोष परब, महेश कदम, संतोष मांजरेकर, शैलेश मुणगेकर, पराग खोत, अक्षय रेवंडकर, बाबू पेडणेकर, राजू शेट्ये, तात्या गोलतकर, प्रवीण मुणगेकर, आंबू मिठबावकर, संजय मिठवबावकर, आनंद गोलतकर, नवनाथ गोलतकर, कविता गोलतकर, छाया मिठबवकर, यासह अन्य उपस्थित होते.