शिवसेनेच्या पुढाकाराने कासु ग्रामपंचायत हद्दीतील पांडापुर गावातील विकास कामांचे भूमिपूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेण येथे शिवसेनेच्या पुढाकाराने ग्रुप ग्रामपंचायत कासू मार्फत पांडापूर गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख व पंचायत समिती सदस्य नरेश गावंड यांच्या हस्ते करण्यात आले.

14वा वित्तअयोगातून 9 लाख रुपयांच्या निधीतून सदरची कामे करण्यात येणार आहेत. पांडापुर गावातील वेगवेगळ्या ठिकाणी दोन अंतर्गत रस्त्यांना फेव्हर ब्लॉक बसवून अत्याधुनिक करणे, 5 सार्वजनिक शौचालये उभारणे या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या विकास कामांचा पांडापुर गावातील सुमारे 6 हजार ग्रामस्थांना लाभ होणार आहे.

सर्व सोयींनी उपयुक्त 5 सार्वजनिक शौचालय उभारल्याने गावातील मंदिरांमध्ये येणाऱ्या भक्तांच्या तसेच ग्रामस्थांच्या नित्यविधीची सोय झाली आहे. या कार्यक्रमाला कासु ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनंदा गावंड, कासु ग्राम पंचायत उपसरपंच प्रेक्षिता तांडेल, कासु ग्रामपंचायत सदस्य मनोज तांडेल आणि शिवसेना शाखाप्रमुख पांडापुर, उपशाखाप्रमुख, महिला आघाडी व युवा व युवा सेनेचे पदाधिकारी यांच्यासह पांडापुर विभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.