शिवसेनेने केलेल्या कामांच्या जीवावर भाजपच्या प्रचाराचे भूमीपूजन, संजय राऊत यांची टीका

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईमध्ये येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते महत्त्वाकांक्षी विकासकामांचे भूमिपूजन-लोकार्पण होणार आहे. ही विकासकामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणि शिवसेनेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झालेली असल्याचे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लक्षात आणून दिले. मोदी यांच्या दौऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, या अनेक प्रकल्पांची योजना पायाभरणी , सुरुवात अनेक अडथळे पार करून ही शिवसेनेची सत्ता असताना महानगरपालिकेने केली आहे. त्यातल्या प्रमुख प्रकल्पांचे उद्घाटन करायला मोदीजी येत आहेत. हे शिवसेनेचे यश आहे.

मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलतानासंजय राऊत म्हणाले की, या अनेक प्रकल्पांची योजना पायाभरणी , सुरुवात अनेक अडथळे पार करून ही शिवसेनेची सत्ता असताना महानगरपालिकेने केली आहे. त्यातल्या प्रमुख प्रकल्पांचे उद्घाटन करायला मोदीजी येत आहेत. हे शिवसेनेचे यश आहे. शिवसेनेनेच सुरू केलेल्या कामांना जी गती मिळाली त्यामुळे भाजपला आज या त्यांच्या प्रचाराचे भूमिपूजन करता आलं, हे प्रचाराचं भूमिपूजन आहे. संजय राऊत हे भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी जम्मूच्या दिशेने रवाना झाले. यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ‘अखंड भारताचे स्वप्न आहे. भारत कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एक आहे आणि त्या अखंड हिंदुस्थानावर शिवसेनेची पावले उमटायला हवीत म्हणून सुरुवातीपासून अंतिम टप्प्यापर्यंत आम्ही त्या यात्रेत सहभागी होतो. आपण जम्मूमध्ये आंदोलन करत असलेल्या विस्थापित कश्मिरी पंडितांची आणि विस्थापित शीख मंडळींचीही भेट घेणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. जम्मूत आमचा पक्ष चांगल्या प्रकारे काम करत आहे, मी पक्षासंदर्भातही जाऊन पाहणार आहे. उद्धव ठाकरे यांनी काही सूचना दिलेल्या आहेत त्यांचेही पालन मी करणार आहे, असे ते म्हणाले.