शपथपत्रे शिवसेना भवनमध्येच जमा करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळत असून शिवसैनिक दररोज मोठय़ा संख्येने ‘मातोश्री’ निवासस्थानी शपथपत्रांचे गठ्ठे आणून देत आहेत. मात्र ही शपथपत्रे मुंबईतील शिवसेना भवन येथे जमा करावीत, असे आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले आहे.

शिवसैनिकांकडून येणारी शपथपत्रे दादर पश्चिम येथील शिवसेना भवन येथे जमा करून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी शपथपत्रांचे गठ्ठे  शिवसेना भवन येथेच आणून जमा करावेत, असे शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना भवन येथून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून जाहीर केले आहे.