
सामना प्रतिनिधी, रत्नागिरी
प्रचंड संख्या बळाच्या जोरावर रत्नागिरी पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. रत्नागिरी पंचायत समितीच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे शंकर सोनवडकर बिनविरोध विजयी झाले.
रत्नागिरी पंचायत समितीचे उपसभापती सुनील नावले यांनी सव्वा वर्षांचा कालावधी पूर्ण होताच राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी आज निवडणूक झाली. शिवसेनेकडून करबुडे पंचायत समिती गणातून निवडून आलेले शंकर सोनवडकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. रत्नागिरी पंचायत समितीत २० पैकी १८ सदस्य शिवसेनेचे आहेत. त्यामुळे निवडणूकीसाठी शंकर सोनवडकर यांचा एकमेव अर्ज आला होता.
दुपारी अडीच वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शंकर सोनवडकर यांना बिनविरोध विजयी घोषित केले. विजयानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, जि.प.गटनेते उदय बने, सभापती विभांजली पाटील शिवसेनेचे सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
































































