
सामना प्रतिनिधी । नागपूर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दि. 7 एप्रिल रोजी विदर्भ दौऱयावर येत असून रामटेक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप, रिपाइं महायुतीचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत. भगवा झंझावात आता विदर्भात धडाडणार आहे.
सायंकाळी 5 वाजता कळमेश्वर येथील कृषी बाजार समितीच्या मैदानात महायुतीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर दुसरी सभा कन्हान येथे तेजाब कंपनीच्या मैदानावर होणार आहे.
8 एप्रिल रोजी चंद्रपूरचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचाराकरिता वणी येथे जाहीर सभा होणार आहे. तर दुसरी जाहीर सभा यवतमाळ-वाशीमच्या युतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्याकरिता यवतमाळ येथील समता मैदान येथे होणार आहे.

























































