“देवीच्या आगमनापूर्वीच महाराष्ट्रावर आलेलं संकट दूर होणार”, खासदार राजन विचारेंचं वक्तव्य

शिवसेनेच्या शाखांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मिंधे गटात वाद सुरु आहे. या वादावरून खासदार राजन विचारे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

माझी देवीकडे एकच प्रार्थना आहे की, महाराष्ट्रावर ज्या भ्रष्टाचारी लोकांनी घाला घातलेला आहे. महाराष्ट्रवर जे संकट आलं आहे, ते लवकरात लवकर दूर व्हावं. देवीच्या आगमनापूर्वीच आता काही दिवसातच महाराष्ट्रावर आलेलं संकट देवी दूर करेल आणि सर्वकाही योग्य प्रकारे सुरळीत करेल. असा मला विश्वास आहे.”, असे राजन विचारे यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “शाखा हे आमचं घर आहे. मंदिर आहे. ते जर तुम्ही उध्वस्त करणार असाल तर जनता तुम्हाला नक्कीच उत्तर देईल.”