नाणार प्रकल्प शिवसेनेमुळेच जाणार! विरोधकांचा डाव सुनील प्रभूंनी हाणून पाडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नागपूर

नाणार प्रश्नावरून विधानसभेत आज शिवसेनेने जबरदस्त आक्रमक रूप धारण केले.  शिवसेना आमदार राजन साळवी यांनी हा मुद्दा बुधवारीच सदनात उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. कामकाज स्थगित झाल्याने ते शक्य झाले नाही. कामकाज स्थगित होताच बुधवारी शिवसेनेच्या आमदारांनी नागपुरात आलेल्या नाणारवासीयांची भेट घेतली.

Saamanaonline

LIVE विधानसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण

यावेळी शिवसेना आमदारांनी आंदोलनकर्त्यांशी संवादही साधला. या संवादानंतर  कृती समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी भाषण केले. शिवसेनेमुळे हा प्रकल्प कधीही होणार नाही हा विश्वास नाणारवासीयांमध्ये निर्माण झाल्याची भूमिका वालम यांनी मांडल्याची माहिती शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी दिली.  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांना भेट नाकारली यातच मोठा विजय झाल्याचंही वालम यांनी म्हटल्याचं प्रभू यांनी सभागृहात सांगितलं. जर मी  सदनाला दिलेली माहिती खोटी असेल तर मला द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे असं आव्हानही प्रभू यांनी दिलं आहे.  या प्रश्नावरून विधानसभेत जबरदस्त गदारोळ झाला, ज्यामुळे प्रभू बे बोलत असतानाच सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.