
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून एक परंपरा आहे. त्या परंपरेनुसारच आमचा दसरा मेळावा होणार आहे. शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणार दसरा मेळावा, हाच शिवसेनेचा खरा दसरा मेळावा असून इर सर्व बोगस आहे. त्या बोगस, सडक्या धान्यांनी गुजरातमध्ये मेळावे घ्यावेत, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंध्यांचा चांगलाच समाचार घेतला.
मिंधेनी त्यांचा दसरा मेळावा, सूरत किंवा बडोद्याला घेतला पाहिजे. त्यांच्या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहा यांना बोलावले पाहिजे. आता त्यांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच आयोजित केल्याने ते निशान ए पाकिस्तान आहेत. मात्र, मुंबईतील दसरा मेळावा हा हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पंरपरेनुसार शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार आहे, इतर सर्व बोगस आहे. ते सर्व सडके धान्य आहे, त्यांनी गुजरातमध्ये मेळावे घ्यावे, ते इथे नाटके कशाला करत आहेत.
दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे, त्यात व्यथीत होण्यासारखे काय आहे? जनतेत अशी सकारात्मक चर्चा असेल, तर ते चांगले आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहे. महाराष्ट्रहितासाठी त्यांच्यात चर्चा आणि संवाद होत आहे. वैचारिक आदान-प्रदान होत आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे अशा सकारात्मक गोष्टींची जनतेते चर्चा होत आहे, हे चांगले आहे, असेही ते म्हणाले. आमच्या परंपरेप्रमाणे ज्या गोष्टी आहेत, त्या आम्ही करू. आमचा मेळावा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा नाही, कमलताई गवई यांचे नाव टाकून त्यांना बोलावले, यांना बोलावले, त्यांना बोलावले, काँग्रेसवाल्यांना बोलावले, असे आम्ही करत नाही. आमचा दसरा मेळाला ही परंपरा आहे, त्या परंपरेचा पालन केले जाईल, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा कधीही खंडीत होत नाही.