राजकीय श्रेयासाठी दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन लटकवले, राजन विचारे यांनी उठवला संसदेत आवाज

दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण होऊन सहा महिने लोटले आहेत. राजकीय श्रेय लाटण्यासाठी या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा घाट सत्ताधाऱयांनी घातला आहे. पंतप्रधानांना वेळ नाही त्यामुळे उद्घाटन लांबणीवर पडल्याने या भागातील नागरिकांची फरफट सुरूच आहे. या रखडपट्टीच्या विरोधात शिवसेना नेते-खासदार राजन विचारे यांनी संसदेत आवाज उठवून रेल्वेच्या कारभारावर टीका केली. जर दिघा रेल्वे स्थानक लवकर सुरू झाले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दिघा येथे येण्यासाठी या कर्मचाऱयांना ठाणे पिंवा ऐरोली रेल्वे स्थानकात उतरावे लागते. या प्रश्नावर शिवसेना नेते-खासदार राजन विचारे यांनी अधिवेशनामध्ये संसदेत शून्य प्रहरात चर्चा केली.

– दिघा रेल्वे स्थानकाचे काम मार्चमध्येच संपले आहे. तेव्हापासून हे स्थानक बंद असल्यामुळे रेल्वेचा कोटय़वधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. रेल्वे स्थानक बंद असल्यामुळे येथील नागरिकांना आणि आयटी कर्मचाऱयांना ठाणे आणि ऐरोली स्थानकात उतरावे लागते आणि खासगी वाहनांतून दिघा येथे यावे लागते. याकडे खासदार राजन विचारे यांनी लक्ष वेधले.