राजधानी नवी दिल्लीत नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सुरू असतानाच जम्मू कश्मीरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी एका भाविकांच्या बसवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 33 जण जखमी झाले आहेत. या घटनेचा उल्लेख करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे.
याबाबत संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, याआधी दहशतवादी घटना फक्त कश्मीर खोऱ्यात घडत होत्या. मात्र, मोदी सरकार एवढे मजबूत होते की कलम 370 हटवल्यानंतर अशा घटना जम्मूमध्येही घडत आहेत. आजही जम्मूमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे, असे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
पहले आतंकी घटनायें कश्मीर की घाटी में होती थी . मोदी सरकार इतनी मज़बूत साबित हुई कि 370 हटने के बाद आतंकी हमले जम्मू संभाग में होने लगे जो पहले कभी नहीं होते थे .
आज भी जम्मू संभाग में ही हमला हुआ है जिसमें दस लोगों की मौत हो गयी.
मोदी शपथ ले रहेथे और जम्मू में आतंकवादी खुनी खेल…— Sanjay Raut (@rautsanjay61) June 9, 2024
राजधानी नवी दिल्लीत मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत होते आणि जम्मूत दहशतवादी खूनी खेळ खेळत होते. कश्मिरी पंडित अजूनही त्यांच्या घरी परतू शकलेले नाही. मोदीजी कश्मिरी पंडितांची घरवापसी कधी होणार, असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.