पालघरमधील शिवसैनिकांचा स्वस्त धान्य दुकानांवर वॉच

1079

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यातील शिवसेनेचे आमदार, लोकप्रतिनिधी व जिल्हाप्रमुखांना स्वस्त धान्य दुकानांवर वॉच ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शिवसेना पालघर जिल्हा खासदार राजेंद्र गावित व शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांनी गुरुवारी पालघर तालुक्यातील मनोर विभागातील स्वस्त धान्य दुकानांना भेटी देऊन तेथील धान्य वितरणाची तपासणी केली. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांची उपासमार होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. केंद्राकडून आलेले अतिरिक्त धान्य लाभधारकांपर्यंत वेळेत पोहोचावे, यासाठी राज्य सरकारने पुरवठा विभाग तसेच स्वस्त धान्य दुकान चालकांना सूचना दिल्या आहेत.

तक्रार नोंदवण्यासाठी संपर्क क्रमाक दिला

स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना धान्य मिळत नाही, अशा तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार राजेंद्र गावित व जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांनी स्वतः धान्य वितरणाच्या ठिकाणी पाहणी केली. तसेच यासंदर्भात काही तक्रार असेल तर ती नोंदवण्यासाठी संपर्क कार्यालयातील मोबाईल क्रमांकही त्यांनी जाहीर केला.

आपली प्रतिक्रिया द्या