तृप्ती देसाईंनी शिर्डीत स्टंटबाजी केल्यास काळे फासणार, शिवसेना महिला आघाडीचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
trupti-desai-bhumata-brigade

तृप्ती देसाई यांनी साई मंदिरातील ड्रेसकोडप्रकरणी शिर्डीत येऊन काही स्टंटबाजी केली, तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा व ‘शिवसेना स्टाइल’ने उत्तर देण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडीने दिला आहे.

शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अनिता जगताप म्हणाल्या, ‘पेहरावाबाबत संस्थानने विनंती केलेली आहे; सक्ती केलेली नाही. या मुद्द्याकडे लक्ष वेधत जगताप यांनी महिलांवर जेव्हा अत्याचार होतात, तेव्हा या तृप्ती देसाई कुठे असतात?’ असा सवाल केला.

सोवळे घालून पंचाने अंग झाकणाऱया पुजाऱयांना अर्धनग्न म्हणणाऱया देसाईंचे संस्कृतीबद्दलचे ज्ञानच अर्धवट असल्याचे दिसते. हिंदुस्थानी संस्कृतीत हजारो वर्षांत यावर कोणीही आक्षेप घेतलेला नाही.

तृप्ती देसाईंनी स्टंटबाजी करण्यासाठी शिर्डीत प्रवेश केला, तर ‘शिवसेना स्टाइल’ने धडा शिकविण्यात येईल, असा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या तालुका संघटक स्वाती परदेशी यांनी दिला आहे.