सचिनच क्रिकेटचा डॉन, नेटीझन्सचा अख्तरला बाऊन्सर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कराची 

आपणच क्रिकेटचे डॉन असल्याचे ट्विट करीत अकलेचे तारे तोडणार्‍या शोएब अख्तर या पाकिस्तानच्या माजी तेज गोलंदाजाला नेटीझन्सच्या बाऊन्सरचा सामना करावा लागला. नेटीझन्सने त्याची खिल्ली उडवत ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकरच क्रिकेटचा डॉन असल्याची आठवण करून दिली.

शोएब अख्तरने आपले काही फोटो ट्विटरवर शेअर केले. त्यासोबत जनता मला नेहमीच क्रिकेटचा डॉन म्हणायची, पण मी कधीच कोणाला दुखवले नाही. देशबांधवांच्या प्रेमाखातर क्रिकेट खेळत होतो हे विधानही त्याने जोडले. यावर शोएब अख्तरला ट्रोल करण्यात आले. एका नेटीझन्सकडून शोएब अख्तरला विचारण्यात आले, ‘सचिनला विसरलास का?’ याचसह सचिनने शोएब अख्तरची धुलाई केलेला व्हिडीओही शेअर केला.